in

धारावी पूरमुक्ती पोहोचली १९० कोटींवर, बीएमसीवर ९० कोटींचा अतिरिक्त भार

पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याने धारावीत मलवाहिनी, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणसह विविध कामे २०१७ पासून सुरू होती. परंतु, या कामांच्या स्वरूपात बदल झाल्याने या प्रकल्पाच्या खर्चात ८९ कोटी ९९ लाखांची वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च आता १०० कोटींवरून १९० कोटींवर पोहोचला आहे. काम सुरू असताना कामाच्या स्वरूपात बदल झाला. तसेच, भूमिगत सुविधा आणि इतर कारणांमुळे या खर्चात ८९ कोटी ९९ लाखांची वाढ झाली.

धारावी, माटुंगा, शीव परिसरात २०१५ मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रेल्वे मार्गात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प पडली होती. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने विविध उपाय सुरू केले. यात एमजी रोड व संत रोहिदास मार्गावर पिवळा बंगला येथील नवीन पातमुखापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या पेटिका तयार करणे, संत रोहिदास मार्गावर ७०० आणि ५०० मिलिमीटर व्यासाची मलवाहिनी टाकणे, त्याचबरोबर संत रोहिदास मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करून दुरुस्ती करणे, एमजी रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी कामांचा यात समावेश होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत BEST बसने प्रवास करायचा असेल, तर लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

IND vs NZ 1st Test, Day 5 : न्यूझीलंडला 150 धावांची गरज, तर भारत विजयापासून 5 विकेट दूर