in

भंडाराची धाकड गर्ल; धनश्री हातझाडे ट्रँक्टर दुरूस्ती करणारी बनलीय पहिली तरुणी

Share

मुलगी आणि तीही गॅरेजमध्ये काम करते, हे एकूणच प्रथम तुम्हाला नवलं वाटेल. कारण क्वचितचं अशा घटना ऐकण्यात येतात. अशाच एका प्रतिभावंत आणि जिद्दी अशा धनश्री हातझाडे या तरुणीची स्टोरी लोकशाही ब्रेकफास्ट स्टोरीमध्ये घेऊन आलाय. चला तर जाणून घेऊयात नेमकी हि स्टोरी…

उच्च शिक्षण घेतलं म्हणजे मोठ्या पगाराच्या दिशेने अनेकांची पळवाट असतेचं. मात्र भंडारा जिल्ह्यातल्या धनश्री हातझाडे हिने मेकॅनिकल इंजिनीयरींगचे शिक्षण घेऊन वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. गॅरेजमध्ये ती सध्या ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करतेय. त्यामुळे पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ट्रँक्टर दुरूस्तीचे काम करणारी धनश्री हातझाडे भंडारा जिल्ह्यातील पहीली तरुणी ठरलीय.

दरम्यान धनश्रीच्या जिद्द आणि चिकाटीचे आता सर्वत्र कोतूक होत आहे. तसेच धनश्री करीत असलेल्या कामा बद्दल अभिमान असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘मातोश्री’वरील आंदोलनावर मराठा आंदोलक ठाम

Watch Video; सोनसाखळी चोरीचा थरार सीसीटीव्ही कैद