in

पालकमंत्री धनंजय मुंडेंवरच अविश्वास; कोविड सेंटर्सकडून कोट्यवधींची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप

विकास माने | बीड जिल्ह्यात एकीकडे कोरोना महामारीच्या काळात शासकीय वैद्यकीय सेवक अहोरात्र सेवा देत लाखो रुग्णांचे जीव वाचवित असताना दुसरीकडे कोविड सेंटर्सकडून रुग्णांची मोठी आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबुराव पोटभरे यांनी केला. पोटभरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे हा गंभीर आरोप केला.

दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील शासनमान्य खासगी कोविड सेंटर्सकडून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची लूट झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबुराव पोटभरे यांनी केला आहे. त्यामुळे कोविड  सेंटर्स चालकांचे तात्काळ ऑडिट करा आणि मृत रुग्णांचा देखील अहवाल सादर करून दोषींवर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाबुराव पोटभरे यांनी दिलाय.

विशेष म्हणजे पोटभरे हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. आता थेट पोटभरे यांनीच जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केल्याने धनंजय मुंडेंच्या विश्वासाहर्तवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नियोजन समितीचे सदस्यच पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे गंभीर आरोप करत असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या डोखेदुखीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जन्माष्टमीच्या निमित्ताने सिल्लोडमध्ये भाविकांची गर्दी

KBC 2021 | ‘या’ शोद्वारे सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला