लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून तूर्तास अभय मिळाला असून त्यांचे मंत्रीपद तरी अद्याप शाबूत असल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार काय म्हणाले ?
“त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझ कर्तव्य आहे. त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकलं जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.