in

धनंजय मुंडे प्रकरण : भाजपा आक्रमक, तर फडणवीस यांची सावध प्रतिक्रिया

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. यावरून धनंजय मुडेंविरोधात किरीट सोमय्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेंड्याचे कातडीचे सरकार म्हणत सरकारवर निशाणा साधला. परंतु या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला. त्यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी , या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही विचार केला पाहिजे. धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही यातील कायदेशीर बाब मांडली आहे. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर, राज्यभर आंदोलन, भाजपाचा इशारा

महाराष्ट्राला लसीचे कमी डोस मिळाल्याची तक्रार, केंद्र सरकारचा इन्कार