in

‘धनंजय लवकर बरा हो’ पंकजा मुंडे पुढे म्हणतात की…

Share

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कालपासून मोठ्या प्रमाणात पसरत आहे, आतापर्यंत महाविकास आघाडीतल्या 3 नेत्यांना करोनाची लागण झाल्याने मंत्रीमंडळात भितीचं वातावरणदेखील आहे. तर दुसरीकडे कट्टर विरोधी पक्षात असलेल्या बहिणीने आपल्या कोरोना संक्रमित भावाची चौकशी केल्याने चर्चांना उधाणदेखील आलं आहे.

धनंजय तु लवकर बरा हो, स्व:ताची आणि कुटुंबाची काळजी घे, घरी आई आणि लहान मुली आहेत, त्यामुळे जरा सांभाळ, अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडे यांनी आपला भाऊ धनंजय मुंडेंची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. तर धनंजय मुंडे यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांच्या टेस्टिंग करण्यात आल्या, त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संबंधितांना दिलासा मिळाला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत संपुर्ण राज्याचे लक्ष या दोघांच्या लढतीकडे होते. त्यात धनंजय मुंडेंनी लढाई जिंकली मात्र आपल्याच पक्षातील काही नेत्यांमुळे माझा पराभव झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. या सगळ्या घडामोडीनंतर पहिलीवेळ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात बोलणं झाल्याचंही सुत्रांकडून समजते आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘या’ अभिनेत्रीच्या आईला झाली कोरोनाची बाधा

भारतात चर्चेत असलेल्या पाकिस्तान क्रिकेटरला झाली कोरोनाची लागण