in

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस महासंचालकांचे सखोल चौकशीचे आदेश

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पत्रकारांशी बोलताना, सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. होते. त्यानंतर आता पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हीने पुण्याच्या वानवडीतीत रहिवासी इमारतीवरून उडी मारली. या आत्महत्येनंतर महाविकास आघाडीतील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. विरोधकांनीही या नेत्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. तसेच आता राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड करत आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणात अजूनही पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. याप्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रभासने शेअर केला ‘राधे श्याम’ चा टीझर

जळगावमध्ये पित्याच्या हातून मुलाचा खून