in

नारायण राणे म्हणजे दबंग नेते – देवेंद्र फडणवीस

लोकशाही न्यूज नेटवर्क
नारायण राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. नारायण राणे यांचं झोप विसरून ते मेहनत करतात. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या वेळी काढले. सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक.

सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होतं. 650 हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आरोग्य व्यवस्थेचा विचार करणे गरजेच आहे. नारायण राणे यांना मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. यावेळी विरोधक महाराष्ट्रात मेट्रो आणि समृद्धीच्या प्रकल्पांना विरोध करतात असे म्हणतं ठाकरे सरकावरसुद्धा टीका केली

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तराखंडमधील दुर्घटनेत १००-१५० जण वाहून गेल्याची भीती…रेस्क्यू ऑपरेशन सुरू

नारायण राणेंवर अन्याय होणार नाही, अमित शहांची ग्वाही