in ,

”अशोक चव्हाणांनी गडकरींसारख काम करून दाखवावे”, देवेंद्र फडणवीसांचा शाब्दिक चिमटा

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली होती. नितीन गडकरी म्हणजे राइट मॅन इन ए राँग पार्टी असे विधान केले होते. या विधानावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्र सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचे काम आपल्याला अधिक आवडते असे विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘सरकारची एकूण कामगिरी निराशाजनक आहे. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी सर्व राज्यांशी संपर्क ठेवतात. महाराष्ट्रासाठी देण्याची त्यांची तळमळ आहे. अन्य मंत्र्यांच्या तुलनेत त्यांचे काम चांगले आहे. आमचे राजकीय मतभेद आहेत, पण गडकरी म्हणजे राइट मॅन इन ए राँग पार्टी असे म्हणावे लागेल, असे ते म्हणाले आहेत.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी सारखं काम करून दाखवावे असे आवाहन देत, तुमची ही स्तुती होईल असा सल्लाच त्यांनी यावेळी चव्हाण यांना दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Amul vs PETA | १० कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणण्याची अमूलची मागणी

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय