in

ठाकरे सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारने 15 महिने काहीच न केल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाच्या अतिरिक्त आरक्षणासंदर्भात काही आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोग तयार करण्यात आदेश दिले होते. मात्र, 15 महिन्यांच्या काळात ठाकरे सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मुदतवाढ देण्यास नकार दिला, असे फडणवीस यांनी सांगितले.
आता राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या तर किमान 50 टक्क्यांच्या आतमधील आरक्षण तरी वाचवता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘आरक्षणाविरोधात भाजपच लोकांना कोर्टात पाठवतोय’

देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात