in

आता तरी निर्बंध कमी करा… फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

headline – 1, devendra fadnavis news, devendra fadnavis letter, devendra fadnavis writes letter to uddhav thackeray

नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. अनेक दिवसांच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यवसाय आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

राज्यात ज्या भागात संसर्गाचं प्रमाण कमी तिथे शिथीलता द्या

राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्‍याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे, असं महत्त्वाचं मत फडणवीसांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अमरावतीत ३ कोटी ५० लाखांची रक्कम जप्त, हवाला रॅकेटचा पर्दाफाश