in

कुठे गेला मराठी बाणा? फडणवीस गृहमंत्र्यांच्या निर्णयावर आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनावरून सुरू असलेलं ट्विटर वॉर आता संशयाच्या भवऱ्यात आहे. ठराविक सेलिब्रिटीजने केलेल्या समान वक्तव्यामुळे सरकारवरी अजेंडा रेटल्याची टीका होत आहे. कलाकारांच्या या ट्वीटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर भाजपानं जोरदार आक्षेप घेतला असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सचिन तेंडुलकर आणि तला मंगेशकर यांनी केलेल्या ट्वीट्सवरून त्यांच्यावर टीकेचा पाऊस पडत आहे. आता विरोधकांनी सर्व प्रकरणावर आक्षेप नोंदवत याची चौकशी करण्याची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणावर गुप्तहेरखाते चौकशी करत असल्याचेही सांगितले. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास होणार असल्याची माहिती दिली. यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. हे निंदनीय असून तुमचा मराठी बाणा कुठे गेला, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केलाय. हाच का तुमचा महाराष्ट्र धर्म असे फडणवीस म्हणाले.

आपल्याला यासारखी रत्न शोधून सापडणार नाहीत. भारतासाठी सतत आवाज उठवणाऱ्या भारतरत्नांविरोधात ही कारवाई असल्याचे सांगत फडणवीस यांनी विरोध दर्शवला आहे.

आज काँग्रेस शिष्टमंडळाची झूम मिटिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक पार पाडली. यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युत्तरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का?, असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावरूनच राज्यातील वातावरण तापलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवालही केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांचा होणार नारायण राणे; राष्ट्रवादीचा टोला

दिलासादायक ! कोरोना रुग्णांच्या मृत्यूत घट