in ,

”मातोश्रीचे दरवाजे बंद केले, आम्ही जाणं नाही”,फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची सुरुवात केली आहे, असे म्हणायला हरकत नाही आहे. कारण शरद पवारानंतर त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या सर्व भेटींवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असं वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानीही गेले. त्यावरुन संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. राजकारणामध्ये कुणीही कुणाचा शत्रू नसतो. फडणवीस काल शरद पवार यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही. नांदेडमधील पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान राऊत आणि फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी काळात भाजप नेत्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे उघडणार का आणि फडणवीस मातोश्रीवर जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही उत्तर दिलं आहे. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलंय, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आमंत्रण स्वीकारलं आम्ही’, असं आशिष शेलार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मातोश्री’चं आमंत्रण आम्ही स्वीकारलं

दोन आठवड्यात द्या कोरोना लसींचा हिशोब