in

‘देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत’ संजय राऊतांचा टोला

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपावर आम्ही चौकशी करा असे म्हणत होतो. मात्र विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नसल्याचा शाब्दिक हल्लाबोल केला.

विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,” असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘त्या’ 12 आमदाराच्या नियुक्त्यांबाबत भाजप राज्यपालांना का विचारत नाही ? संजय राऊतांचा सवाल

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षांची आरास…