in

Raj Bhavan Updates : भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला दाखल…निवेदनात महत्वाचे मुद्दे मांडले

पोलीस महासंचालक परमबीरसिंह यांनी फोडलेल्या लेटरबॉम्बनंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आहे. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ राजभवनावर पोहोचले आहे. यामध्ये अशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील दाखल झाले आहेत. यावेळी भाजपाच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांना निवेदन देखील दिले आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच गेल्या काही दिवसांतील घटनांकडे राज्यपालांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून करण्यात येणार आहे. परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग अहवालावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सगळ्या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि तो राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. भाजपच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. 

What do you think?

-10 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वडिलांच्या अस्थिपासून तयार झालेल्या राखेतून युवतीने साकारला टॅटू

देशात रुग्ण दुप्पटीचा वेग २०२ दिवसांवर…५०४ दिवसांवरून मोठी घसरण