in

‘या’ विषयावर राज्याचा एकही मंत्री बोलत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यात लसीकरणावरून केंद्र विरुद्ध महाराष्ट्रात शाब्दिक युद्ध रंगले असताना विरोधी पक्ष नेत्यांकडून सुद्धा सरकारला धारेवर धरले जात आहे. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुठलाच मंत्री बोलत नाही नसल्याच्या टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण सुरु आहे. मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्या आहेत. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

तसेच लसीकरणाचे राजकारण करून महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केला. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुणीच बोलत नाही. हे आधी उपलब्ध करा. मग राजकारण करा”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”सीबीआय चौकशीत खरं-खोटं बाहेर येईलच”

अंबानी बंधूंना SEBI चा दणका, 25 कोटींचा दंड