in

मुख्यमंत्र्यांच्या ‘एकेरी’ उल्लेखावरून देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी

महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अधिवेशन आज तिसऱ्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकारच्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केल्या आहेत.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी सुरु केली. यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत.

या सर्व प्रकरणानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी सभागृहातील सदस्यांना समज दिली. विरोधी पक्षातील नेत्यांचे भाषणे आम्ही शांतपणे एकले आहेत तरी तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांचे भाषण शांत पणे ऐकावे अशी विनंती देखील केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणारच”, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले