in ,

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सरसंघचालकांच्या भेटीला

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही. परंतु, मराठा आरक्षणावर त्यांच्यात चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यावेळी, अधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अखेर मिळालं कुटुंब

आता 10 लाख लोकांना मिळू शकते नोकरी! कारण…