in

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार….

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सर्वात आधी वीजतोडणी करण्यावर स्थगिती देण्यात आल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही स्थगिती उठवली. यानंतर फडणवीसांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. यानंतर पीकविमा देण्यातही सरकारने तत्परता दाखवली नाही. शिवसेना या प्रकरणावर केंद्राकडे बोट दाखवत असून आता ते मूग गिळून बसले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत असताना सरकारचे याकडे लक्ष नाही, असे फडणवीस म्हणाले.,

सचिन वाझेचे वकिल अॅड. उद्धव ठाकरे स्वत: आहेत. सचिन वाझेविरोधात सर्व पुरावे असतानाही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. नक्की वाझे यांच्याकडे काय माहिती लपवली आहे, आणि कशा प्रकारे मुख्यमंत्री त्यांना पाठिशी घालत आहेत, हे उघडकीस आणणार आहोत, असे फडणवीस म्हणाले. या सरकारचा चेहरा उघडा झाला आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पत्रकारांशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. सत्तेचे लचके तोडण्यासाठी एकत्र आलेल्यांनी सर्व प्रकरणांमधून सरकार पळ काढत आहे, असे ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

थकबाकीदारांच्या वीज तोडणीची स्थगिती आठवड्याभरात सर्वसहमतीने मागे, ऊर्जामंत्र्यांनी दिली माहिती

सचिन वाझेंचा शिवसेनेशी संबंध काय, उद्धव ठाकरे म्हणाले…