in

देशात डेंग्यूचं थैमान!

देशात परतीच्या पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. कोरोना महामारीचं संकट डोक्यावर असताना आता देशभरात डेंग्यूचा धोका वाढताना दिसतोय. दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रूग्ण सापडतात. त्यातच आता देशात पुन्हा डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळताना दिसत आहे.

उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा कहर पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा या राज्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत तब्बल 12 हजार रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर आता महाराष्ट्रात देखील डेंग्यूचे रूग्ण सापडत आहेत.

तरूणांसह लहान मुलं देखील डेंग्यूच्या विळख्यात सापडल्याचं दिसतंय. आतापर्यंत 88 लहान मुलांसह 114 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्य़ाभरात रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना बेड मिळत नसल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर खासगी रूग्णालयात देखील गंभीर परिस्थिती जाणवू लागली आहे.

दरम्यान, कोरोना आणि डेंग्यूची काही लक्षणं सारखी असल्यानं आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. डेंग्यू हे डासांमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन आहे. ज्यात तीव्र ताप, डोकेदुखी, अंग आणि सांधेदुखी, त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

VIDEO: आला रे आला… मुंबई इंडियन्सचं नवं Anthem

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना कार्यक्रम