in

कर्करोगाविषयी जागृकता आणण्यासाठी ‘लोकशाही’ची मोहीम

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज जागतिक कर्करोग दिवस आहे. कर्करोगाविषयी जागृकता आणण्यासाठी ‘लोकशाही’ने मोहीम सुरु केली आहे. ‘गुटखामुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी लोकशाहीचा पुढाकार घेतला आहे. या मोहीमेत अंतर्गत राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु झाला आहे. गुटख्या विरोधात लोकशाहीने सुरू केलेल्या मोहिमेनंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहेत.


जगात प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यासोबतच जगातील एकूण कर्करोग रुग्णांच्या मृत्यूंत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत. यापूर्वी, जगात पाचपैकी एक कर्करोग रुग्ण हा देशातील असल्याचे निरीक्षणात नोंदविण्यात आले होते. तर याचे प्रमाण आता चारवर गेले आहे. यंदा जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आय एम अँड आय विल हा जनजागृतीपर संदेश देण्यात येणार आहे. या माध्यमातून सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करा, कर्करोगाचा धोका टाळण्याचे आवाहन जागतिक स्तरापासून ते स्थानिक स्तरापर्यंत कऱण्यात येणार आहे.


काय आहे लोकशाही न्यूज ची मोहीम ?


गुटख्याविरोधात लोकशाहीची मोहीम
तंबाखू खाताना कोणी दिसले तर, फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करुन अनिल देशमुख आणि मुख्यमंत्र्यांना टॅग करा आणि लोकशाहीच्या महाराष्ट्र गुटखा मोहिमेत सहभागी व्हा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुप्रिया सुळेंना गाझीपूर बॉर्डरवर रोखलं

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, निलेश राणेंचा प्रहार