in

मराठवाड्यातील खादीला देशभरातून मागणी;मराठवाड्यातील तिरंगा देशभर फडकणार

ध्वजवंदनासाठी खादीचेच झेंड वापरावेत, असा नियम आहे. कर्नाटक राज्यातील हुबळीसह खादी उद्योगात अग्रणी असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीमार्फत खादीचे राष्ट्रीय ध्वज तयार केले जातात. समितीचे मुख्यालय नांदेड येथे असून त्याठिकाणी खादी ध्वज तयार केली जातात. तर, त्यासाठी लागणारे कापड निर्मितीचे काम उदगीर येथे केले जाते, अशी माहिती खादी इंडियाचे येथील व्यवस्थापक सावंत यांनी दिली

स्वातंत्र्यदिनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून, राष्ट्रध्वज घेण्यासाठी सराफा बाजार तसेच कॅनॉट गार्डन येथील खादी इंडिया येथे नागरिकांची एक ऑगस्टपासूनच गर्दी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली असून, आतापर्यंत पाच लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. तर, खादी कपड्यांही मोठी डिमांड असल्याचे खादी भांडारचे व्यवस्थापक राम सावंत यांनी सांगितले. दरम्यान, मराठवाड्यात तयार होणारे राष्ट्रध्वज देशभरातील विविध भांडारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून, वर्षभरात पावणेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न यातून मिळते.

.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

127th Amendment Bill । 127 वी घटनादुरुस्तीला लोकसभेत मंजुरी

Lokshahi Impact । लोकशाहीच्या बातमीनंतर शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारेंची बदली