in

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं…

Share

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यापासून विरोधी पक्ष करत होते. या संदर्भातच याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. हि याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून याचिकाकर्त्यांना चांगलंच झापलं आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हि याचिका फेटाळताना, “तुम्ही करत असलेले सर्व उल्लेख मुंबईमधील असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही” असं स्पष्ट सांगितले. तसेच “तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?,” अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना फटकारले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नवरात्री 2020 घटस्थापना मुहूर्त: जाणून घ्या विधी आणि नियमआध्यात्म

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह