in

IPL 2021 | दिल्लीसमोर आज पंजाबचे आव्हान

आयपीएल स्पर्धेत धडाक्‍यात प्रारंभ करणारा दिल्ली संघ नंतर आपली जादू कायम ठेवण्यास कमी पडली. आज दिल्लीसमोर आज पंजाबचे आव्हान आहे. पंजाब संघाची कामगिरीही फारशी सातत्यपूर्ण नसली तरीही दिल्लीपेक्षा त्यांची बाजू काहीशी वरचढ वाटत आहे. यामुळे कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हे दोघेही ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजीवर ते कसे खेळतात यावर संघाचे यश अवलंबून आहे. शॉ व धवन वगळता अजिंक्‍य रहाणे, मार्कस स्टोनिस हे प्रमुख फलंदाज फारसे भरात नाहीत.

पंजाबबाबत बोलायचे झाले तर त्यांची फलंदाजी हीच त्यांची खरी ताकद आहे. मात्र, सलामीवीर मयंक आग्रवालला येत असलेले अपयश त्यांची चिंता वाढवणारे ठरत आहे. कर्णधार लोकेश राहुल सातत्यपूर्ण कामगिरी करत असला तरीही त्याला मधल्या फळीत ख्रिस गेल व्यतिरिक्त अन्य कोणाचीही साथ लाभले नाही. दोन्ही संघांसाठी हा सामना विजयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

सामन्याची वेळ
सायंकाळी : 7.30
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

UGC NET 2021 Postpone | NET २०२१ ची परीक्षा लांबणीवर टाकण्याची विद्यार्थ्यांची मागणी

JEE MAIN | जेईई मेन परीक्षेला स्थगित