in

Delhi Lockdown | राजधानीत लॉकडाऊन, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर रात्रीचं लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

या लॉकडाऊनमध्ये खाद्य पदार्थ सेवा, औषध पुरवठा आदी अत्यावश्यक सेवा सुरुच राहतील. विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहता येईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. स्थलांतरित कामगारांनी दिल्ली सोडून जाऊ नये. मला खूप आशा आहे की आम्हाला यापुढे लॉकडाऊन वाढविण्याची गरज भासणार नाही. सरकार तुमची काळजी घेईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीचा उपयोग ऑक्सिजन, औषधे उपलब्ध करण्यासाठी केला जाईल. दिल्लीत आणखी बेड्स उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मोठी मैदाने, मंदिर परिसर तसेच रिकाम्या जागांवर कोव्हिड उपचार केंद्रांची स्थापना करण्याचे काम दिल्ली सरकारने वेगाने चालू केले आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची दैनिक संख्या आता २५ हजारांच्या पुढे गेली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sensex Crash | शेअर बाजारात घसरण , सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक कोरोना पॉझिटिव्ह