in ,

देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो – अतुल भातखळकर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. याबबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली असून यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो. सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता तरी मंत्रिमंडळातून कमी झाला अशी टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरलं हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार, अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh Resigns: मविआची दुसरी विकेट… गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा

Anil Deshmukh Resigns: “जे जे चुकेल त्याला शासन…तरच लोकशाही सुदृढ होणार”