in

दीपिका, प्रियंका चोप्राच्या प्रचंड फॉलोअर्समधली फेक अकाऊंट्स आली समोर…

deepika and priyanka
deepika deepika and priyankaand priyanka
Share

तुमचं जर इन्स्टा, फेसबुक, ट्विटर अशा बड्या सोशल मिडीयावर अकाऊंट असेल, तर तुम्ही त्याचे रोज फॉलोअर्स चेक करत असता. सगळ्यांच्या सोबतच तुमचेही फॉलोअर्स किंवा तुमच्याकडे असलेल्या लाईक्सची संख्या जास्त असावी, असं सहाजिकच तुम्हाला वाटत असते. कधी कधी तर फॉलोअर्स किंवा लाईक्स कमी असल्याने आपण तणावामध्ये येत असतो, इतकच नाही तर या फॉलोअर्स आणि लाईक्स कमी असलेल्या प्रकरणामुळे काहींनी आत्महत्या केल्याच्या बातम्यादेखील तुम्ही पाहिला किंवा वाचला असाल.

हे झालं सामान्य लोकांच्या बाबतीत. मात्र अशांचं काय? ज्यांचा मोठ्याप्रमाणात फॅन फॉलोअर्स असतो? जे ग्लॅमरस चेहरे आहेत? मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्र्यांनाही या तणावातून जावं लागत असतं. फॉलोअर्स किंवा लाईक्सच्या प्रकरणातून त्यांनाही वाटत असतं की आपलाही सोशल मिडीयावर मोठा फॅन फॉलोअर्स असावा. त्यासाठी अनेकजण वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात.

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या दोन अभिनेत्रींच्या बाबतीतही अशीच काहीशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. फॉलोअर्सच संख्या वाढवण्यासाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून फेक फॉलोअर्स वाढवत असल्याची माहिती या दोन अभिनेत्रींच्या बाबतीत व्हायरल होत आहे. या दोन अभिनेत्रींच्या सोशल मीडियावर प्रचंड फॅन फोलोविंग आहे. पण आता हेच फॅन फोलोविंग धोक्यात आले आहेत आणि या त्यांच्या फोलोवर्सच्या बाबतीत या दोघींची पोलीस चौकशी होणार आहे.

या दोघींच्या फोलोवर्समध्ये अनेक फेक प्रोफाइल असून एक फेक प्रोफाईलचं रॅकेट आता उघडकीस आलं आहे. त्यासदर्भात नुकतीच मुंबई पोलीसांनी अभिषेक दौडे नावाच्या माणसाला अटक केली आहे. लवकरच याबद्दल आता या दोन अभिनेत्रींची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे तुमचे फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी जर तुम्ही अशा फेक ट्रिक वापरत असाल, तर सावधान!

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Mahapareshan is the first company in the country to use drones

वीजवाहिन्यांवर आता ड्रोनची नजर; ड्रोन वापरणारी ‘महापारेषण’ देशातील पहिली कंपनी

शांताबाईंचा थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल; 85 व्या वर्षातही तरुणाईला लाजवणारी कर्तबगारी