मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता तिच्या कुटुंबीयांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. DFO विनोद शिवकुमार यांना जिथपर्यंत अटक होत नाही, तिथपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला आहे. आरोपी dfo विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्टेशन वर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच धारणी पोलिसात सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर मुख्य प्रधान संरक्षण रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने ४ पाणाची सुसाईड नोट लिहिली. यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी व कर्मचाऱ्यासमोर अश्लील शिवीगाळ करतात.रात्री बेरात्री भेटायला बोलावतात तसेच वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार वर RFO दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माझ्या मुलीला खूप दिवसापासून अधिकाऱ्यांचा त्रास होता. माझ्या घरी dfo सचिन शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होते व दीपालीला शिवीगाळ करत होते. त्यामुळे त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या, अशी मागणी मृत दिपाली चव्हाण यांचे आई शकुंतला चव्हाण यांनी केली आहे.
माझ्या पत्नीने वारंवार वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबतच या प्रकारचे पत्रव्यवहारही केले होते मात्र त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. माझ्या पत्नीला शिव कुमारी अधिकारी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत होते. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले अशी प्रतिक्रिया दिपालीचे पती राजेश मोहिते यांनी दिली
Comments
Loading…