in

आईच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी वैमानिक मुलाचा मृत्यू

Deepak Sathe
Share

केरळमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे आणि आदल्याच दिवशी दीपक साठे यांच्या मृत्यूचे वृत्त घरच्यांना कळले. यावर चांगल्या लोकांना देव घेऊन जातो अशी प्रतिक्रिया दीपक साठेंच्या आईने दिली.

दीपक साठेंचे आईवडील नागपूरमध्ये राहतात. दीपक यांच्या आई लिलाबाई साठे यांचा आज ८३वा वाढदिवस आहे. या प्रसंगाचा आनंद साजरा करण्याआधीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझ्या मुलाने जाताना इतक्या लोकांचे प्राण वाचविले याचा अभिमान असल्याचं लिलाबाई म्हणाल्या.

दीपक साठे आणि त्यांचे आईवडील नागपूरच्या भरत नगरमध्ये राहतात. दीपक यांच्या अपघाती निधनाचे वृत्त त्यांच्या आईवडिलांना कळले त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून सावरल्यानंतर आपल्या कर्तबगार मुलाने प्रवाशांचे प्राण वाचवल्याचा अभिमान वाटतो, असे दीपक यांच्या आईने सांगितले.

दीपक यांच्या मृत्यूचे वृत्त कळल्यानंतर सर्व नातलग तातडीने भरत नगर येथील घरी पोहोचले. याआधी ११ मार्चला सर्वजण एकत्र भेटले होते. नंतर कोरोना संकटामुळे कौटुंबिक गेट टू गेदर पुन्हा झाले नव्हते. त्यामुळे साठे कुटुंबाचे सर्व नातलग जुन्या आठवणींनी भावूक झाले. दीपक साठेंसारखा उत्साही माणूस आकस्मिक निघून गेल्याचा धक्का पचवणे कठीण असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

दीपक यांचे वडील सैन्यात कर्नल पदावर होते तर मोठा भाऊ देखील सैन्यात अधिकारी होता त्यामुळे देश सेवेसाठी वाहून घेतलेल्या साठे परिवारातील विंग कमांडर दीपक साठे यांच्या जाण्याने देशाचं नुकसान तर झालाच आहे पण साठे परिवारातील वृद्ध आई वडीलाचा आधार देखील गेला आहे असे कुटुंबातील सदस्य म्हणाले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

fire

उल्हासनगरमध्ये व्हीनस चौकात सिलेंडरचा स्फोट, १ ठार

मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर ठाकरे सरकार गंभीर नाही – मेटे