in

Maharashra Corona | रूग्णसंख्या खालावली, २ हजार २६ नवीन बाधित

राज्यात कोरोनाचा संसर्ग खालावत चालला आहे. आज ५ हजार ३८९ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, २ हजार २६ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात २ हजार २६ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६२,५१४ झाली आहे. ५ हजार ३८९ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून,आजपर्यंत एकूण ६३,८६,०५९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३१ टक्के एवढे झाले आहे. याचबरोबर २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.तर, राज्यात आजपर्यंत १३९२३३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९३,३७,७१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,६२,५१४ (११.०६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४०,०८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३३,६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हॉटसअप, इंस्टाग्राम, फेसबूकचा सर्व्हर डाऊन ?

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा