in

Petrol, diesel Prices | पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या भावात घट

Share

पेट्रोल, डिझेल, केरोसीनच्या दारात झालेली घट आणि स्वयंपाक गॅसचे (एलपीजी) दर स्थिर ठेवण्यात यश आल्याने सामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये गेल्या महिनाभरात प्रतिलिटरमागे एक ते तीन रुपयांनी घट झाली असून, केरोसीनचे भाव पावणेतेरा रुपयांनी घटले आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील डिझेलच्या किरकोळ विक्री किंमतीत सप्टेंबरमध्ये २.९३ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९७ पैशांनी घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातही डिझेलच्या किमती १७ पैशांनी घटल्या असून, पेट्रोलचे भाव मात्र स्थिर आहेत. घटत्या इंधन दराचा फायदा वाहनचालकांना मिळाला आहे. त्यातही डिझेलच्या किमतीत घट झाल्याने मालवाहतुकदारांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे (कोविड १९) जगभरात टाळेबंदी लागू होती. मागणी घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलचे दर शुन्य डॉलर पर्यंत खाली आले होते. या काळात घटलेल्या इंधन दराचा फायदा आता स्थानिक बाजारपेठेत दिसून येत आहे.

घरगुती स्वयंपाक गॅसच्या दरात जुलै २०२० पासून कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून या काळात दरमहा सरासरी १३ कोटी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच, घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवल्याने कुटुंबाना त्याचा फायदा झाला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Pune University | तिसऱ्या दिवशीही ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ कायम

मुंबईत उद्यापासून मेट्रो धावणार