in

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Share

राज्यभरात पडलेल्या परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्याप्ती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन थेट मदत देण्यात यावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या दिवसांपासून धुमाकुळ घातला होता. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, धान या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यावर राज्यसरकारने निव्वळ पंचनाम्याचे आदेश दिलेत. प्रत्यक्षात मात्र पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

कोरोना महामारीत परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

महिला प्रवाशांसाठी लोकलची दारे खुली; मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही…

NEET Result 2020 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर; शोएबने रचला इतिहास