in

MPSC Exam Postponed : एमपीएससीच्या परीक्षेवर आजच निर्णय; मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

राज्यात MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, जळगावसह अनेक शहरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांचा रोष पाहता एमपीएससीच्या परीक्षेवर आजच निर्णय होणार आहे. या परीक्षा नेमकी कधी होणार याविषयी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. तशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला दिली.

“मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून तोडगा काढावा अशी विनंती विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच विद्यार्थी हताश झाले आहेत. विरोधक दोन्ही बाजूंनी आपली भूमिका मांडत आहेत. त्यामुळे हताश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्ग काढावा ही माझी हात जोडून विनंती आहे,” असंही ते म्हणाले.

दरम्यान विनायक मेटे यांच्या या विधानाचा विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. “विनायक मेटे हे आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 2- 3 वर्षांपासून 80 टक्के विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, यावर मार्ग काढा, तोडगा काढा. आरक्षित जागा बाजूला ठेवून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही”, असं वडेट्टीवार यांनी म्हटले.

विनायक मेटे काय म्हणाले ?

“महाराष्ट्र सरकारनं सध्या राज्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा जो विषय प्रलंबित आहे, त्याचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय योग्य आहे. काही लोकांना तो निर्णय पसंत नसेल, त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या असतील किंवा येत असतील, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षा फक्त पुढे ढकलल्या आहेत, रद्द केलेल्या नाहीत. कोरोनाच्या परिस्थितीत अशा पद्धतीनं गोंधळ घालणंही योग्य नाही. पुढे लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्या जिवाला जर काही बरं वाईट झालं तर हे गोंधळ घालणारे जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये २२ लाख लोकांचे पहिलं शाही स्नान संपन्न

फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?”, राणें बंधूंचा हल्लाबोल