in

Google प्ले-स्टोअरने हटवले धोकादायक अ‍ॅप्स

Share

गुगलने जुलै महिन्यात ११ धोकादायक अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवर बॅन केले होते, त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजून ६ अ‍ॅप्स हटवले होते. हटवण्यात आलेले सर्व अ‍ॅप्स ‘मॅलवेअर जोकर’ या व्हायरसने इन्फेक्टेड आहेत.

Google ने आपल्या प्ले-स्टोअरवरुन १७ धोकादायक अ‍ॅप्स हटवले आहेत. जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत हे १७ अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. सर्व १७ धोकादायक अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन हटवले असले तरी जे युजर्स यांचा वापर करत होते त्यांच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅप्स अजूनही आहेत. फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे अ‍ॅप्स डिलिट करण्याचं आवाहन युजर्सना करण्यात आलं आहे.

यातील ११ अ‍ॅप्स चेक पॉइंटच्या रिसर्चर्सनी जुलै महिन्यात शोधले. तर, नुकतेच हटवण्यात आलेले सहा धोकादायक अ‍ॅप्स सायबर सिक्‍युरिटी फर्म Pradeo च्या अभ्यासकांनी शोधले. २०१७ पासून गुगलने ‘मॅलवेअर जोकर’ने इन्फेक्टेड असलेले १७०० अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. पण दरवेळेस नव्या रुपात हा व्हायरस प्ले स्टोअरवर येत असतो.

धोकादायक Apps :-

 • com.imagecompress.android
 • com.relax.relaxation.androidsms
 • com.file.recovefiles
 • com.training.memorygame
 • Push Message- Texting & SMS
 • Fingertip GameBox
 • com.contact.withme.texts
 • com.cheery.message.sendsms (two different instances)
 • com.LPlocker.lockapps
 • Safety AppLock

Emoji Wallpaper

 • com.hmvoice.friendsms
 • com.peason.lovinglovemessage
 • com.remindme.alram
 • Convenient Scanner 2
 • Separate Doc Scanner

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मराठा आरक्षणासाठी मराठी खासदारांनी एक व्हा – खासदार संभाजीराजे

चेन्नई सुपर किंग्स मधील खेळाडूंची पुन्हा होणार कोरोना चाचणी