in

बापरे…मृतदेह नेला टॅक्सीच्या टपावरून

Share

वसई-विरार | देशभरात कोरोना महामारीने रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे रुग्ण व मृतांची गैरसोय होण्याचे मन हेलावून सोडणारे प्रकार समोर येत आहेत. नालासोपारामध्ये चक्क एका मृतदेहाला मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतदेहाला रुग्णवाहिका न मिळाल्याने टॅक्सीच्या टपावरून स्मशानभूमीत नेल्याची प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या घटनेवर आता शहरभरात संताप व्यक्त होत असून प्रशासनावर टीका होत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे राहणाऱ्या हवालदार सिंग यांच्या पत्नीचं गेल्या रविवारी मध्य रात्री दोनच्या सुमारास निधन झालं होते. त्यांच्यावर विरारच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांनी सकाळी 11 वाजता मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची तयारी केली.यावेळी मुलगा शिवम याने ज्यावेळी मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला, तर तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच, खाजगी रुग्णवाहिकेला फोन केला असता 2000 ते 3000 भाडे आकारणार असल्याने सांगण्यात आले. विशेष म्हणजे मृत व्यक्तीचे घर आणि तुळिंज स्मशानभूमीचं अंतर हे केवळ दोन किमी होते.त्यात लॉकडाऊन मध्ये बंद झालेला व्यवसाय व पत्नीच्या आजारासाठी रुग्णालयात खर्च झालेल्या पैशामुळे आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे मृतदेहासाठी काहीच उपलब्ध होत नसल्याने सिंग यांनी पत्नीच्या मृतदेहाला टॅक्सीच्या टपावरून स्मशानभूमीत नेले. यावेळी टॅक्सीच्या टपावर ठेवून मृतदेह नेतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे या घटनेवर आता शहरभरात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेने कोरोनाच्या महामारीत प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि रुग्णवाहिका चालकाकडून होत असलेली लूट यामुळे वसई विरार नालासोपाऱ्यात मरणानंतर मृतदेहाची कशी परवड होत असल्याचे दिसून आले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी

मुंबईच्या ‘या’ भागात वाढतो कोरोना;पाहा रेड झोनची यादी