in

बापरे ! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण

कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. गंगाराम रुग्णालयातील पाच जणांना रुग्णालयत दाखल करण्यात आलं आहे. कोविड-19च्या साथीच्या नुकत्याच झालेल्या लाटेमध्ये 37 डॉक्टरांनी संसर्गाची पुष्टी केली आहे. सर गंगाराम रुग्णालयाच्या खासगी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कोविड-19 रुग्णालयात उपचार करतांना 37 डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

यापैकी बहुतेक डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. एकूण 32 डॉक्टरांना सौम्य लक्षणे असून पाच डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीत आता कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यासोबतच दिल्लीत रात्रीची संचारबंदी लावला आहे. 30 एप्रिलपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीवर सकाळी 10 ते सकाळी 5 या वेळेत बंदी घालण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादमध्ये महानगरपालिकेच्या कार्यालयामागे तरुणाची हत्या

पुण्यात 33 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल