in

राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं बंद


अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू आहे. यासाठी देशभरातून जनतेकडून देणगी स्वीकारली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये यावरून बरंच वादंग निर्माण झालं होतं.

त्यामुळे आता अशाप्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आली आहे, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत राम मंदिरासाठी जनतेमधून अडीच हजार कोटींची देणगी जमा झाली असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेनं दिली आहे.

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यांसदर्भात बोलताना सांगितलं की, घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं बंद केलं आहे. देणगी द्यायची असल्यास ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर जाऊ शकतात. येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल’.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

‘आणीबाणी बरी होती असं म्हणावं लागेल अशी आजची देशाची परिस्थिती’