in

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह 8 जणांविरोधात न्यायालयिन तक्रार दाखल

Share

सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी राहत्या घरात गळफास घेून आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर बॉलिवूडपासून ते सगळ्याच स्तरांतून सुशांतला श्रद्धांजली देत सोक व्यक्त होताना दिसलं. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला देखील सुरू झाला. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडच्या अनेक मोठ्या नावांना दोष दिला जाऊ लागला. अनेक पोस्ट आणि जुने व्हिडीओ व्हायरल देखील होताना दिसले. तसंच सोशल मीडियावर विविध ट्रेन्ड सुद्धा व्हायरल झाले आणि बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं त्यामध्ये ओढली गेली.

या सगळ्यावर आता बिहार कोर्टामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासहह 8 जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल झाली असून येत्या 3 जुलै रोजी त्यावर सुनावणी आहे. सुशील कुमार ओझा या बिहारच्या वकिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये करण, सलमान आणि एकतासोबत आदित्य चोप्रा, साजीद नाडियाडवाला, भूषण कुमार, संजय लिला भंसाळी आणि दिग्दर्शक दिनेश यांची नावांचा समावेश आहे. या सगळ्यांनी सुशांतच्या सिनेमांवर बहिष्कार टाकला शिवाय त्याला सिनेमे यांच्यामुळे मिळणं बंद झाले आणि त्याला पार्ट्यांना सुद्धा यांच्यामुळे बोलवलं जात नव्हतं आणि या सगळ्यामुळे नैराश्य येऊन सुशांतला या सगळ्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे.

या सगळ्या बॉलिवूडकरांवर 306, 109, 504 आणि 506 ही कलमं लावली गेली आहेत तर अभिनेत्री कंगना राणावतला या केसमध्ये साक्षीदार म्हणून दाखवण्यात आलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नवीन रिलेशनशिपमध्ये ‘या’ गोष्टी टाळा!

ठाण्यातील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण