in ,

पोलिसांवर पेटती काडतुसे फेकणाऱ्यास अटक

yashwant boga
yashwant boga
Share

पालघर – पोलिसांवर पेटती काडतुसे फेकल्याप्रकरणी संतोष शेंडे याला अटक करण्यात आली आहे. शेंडेविरोधात स्फोटक पदार्थ प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. विक्रमगड पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटगी प्रकरणी कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे संतोष शेंडे याला जामीन राहिलेल्या व्यक्तीने जामीन मागे घेतला. या प्रकाराने संतापलेल्या शेंडेने जामीनदारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ला प्रकरणी पोलीस शेंडेला अटक करण्यासाठी त्याच्या घराजवळ पोहोचले. पोलीस आल्याचे लक्षात येताच संतोष शेंडेने घरातून काडतुसे पेटवून पोलिसांच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. सावध पोलिसांनी घराला घेराव घातला आणि सापळा रचून संतोषला अटक केली.

Written by Rohan

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कर्नाटकातून आलेला लाखो रुपयांचा खवा आणि पनीर जप्त

मुंबईत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत