in

आजी-माजी गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारी कायम टिपेलाच!

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहर गुन्हेगारीमुळे नेहमी चर्चेत राहिल आहे. राज्याची उपराजधानी, संत्रानगरी, टायगर कॅपिटल अशा अनेक नावाने नागपुरला जगभरात ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात नागपूरच्या ओळखीत आणखी एकाची भर पडली आही, ती आहे गुन्हेगारीची. परिणामी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारी कायम टिपेलाच दिसून येत आहे.

नागपूरमध्ये गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी दगडाने ठेचून गुंडाची हत्या केली. ही थरारक घटना रविवारी रात्री शांती नगरमधील नारायण पेठ इथं घडली. या घटनेने परिसरामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. विजय वाघधरे असं मृत गुंडाचं नाव आहे. शांतीनगर पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ही घटना अस बोलले जात आहे. विजयविरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते, परिसरात तो आपल्या साथीदारांसोबत हफ्तावसुली करायचा.

दोन वर्षापूर्वी नागपुरात याच शांतीनगर परिसरातील नालंदा चौकात नागरिकांनी मिळून गुंडाची हत्या केली होती. आशिष देशपांडे असं या गुन्हेगाराचं नाव असून वस्तीतील गल्ल्यांमध्ये त्याच्या बेदरकार दुचाकी चालवण्याला लोक कंटाळले होते. नागरिकांनी अनेकदा त्याची पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याने अखेर नागरिकांनी कायदा घेतात आशिष देशपांडेची हत्या केली. आशिष देशपांडे इतर गुन्ह्यांमध्येही सहभागी असल्याची माहिती आहे.

तर नागपूरमधील अक्कूच्या गुंडगिरीला वैतागलेल्या संतप्त जमावाने १३ ऑगस्ट २००४ रोजी सुमारास जिल्हा न्यायालयात ठेचून खून केला होता. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. त्याच्या शरीरावर एकूण ७३ जखमा होत्या. जमावाने अक्कूचे घरही जाळले होते. कुख्यात अक्कू यादव हत्याकांडाचा १० वर्षांनी निकाल लागला. या निकालामध्ये नागपूर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातील अठराही आरोपींची निर्दोष सुटका केली तर सुनावणीकाळात तीन आरोपींचा मृत्यू झाला होता.

नागपुरात आतापर्यंत लोकांच्या संतापाचे बळी ठरलेले गुंड

  • महिलांचा लैगिंक छळ करणारा कुख्यात गुंड गफ्फार डॉनची १९९८ मध्ये गळ्यात टायर बांधून हत्या.
  • खंडणीबहाद्दर बबलू लंगड्याची वाठोडा परिसरात १९९८ मध्ये दगडाने ठेचून हत्या.
  • खंडणी, चोरी, लूटमार प्रकरणातील आरोपी रणजित दहाट याला १९९९ मध्ये मारहाण आणि जाळून हत्या.
  • १९९९ मध्ये कुख्यात गुंड अजीज भुऱ्याची जाळून हत्या.
  • नागपूरमध्ये 2021 मध्ये जानेवारी ते आतापर्यंत 11 हत्या

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तराखंड : ऋषभ पंत चेन्नई टेस्टचं मानधन देणार हिमस्खलनातील पीडितांना

सेलिब्रिटिंचे टि्वट ही अभिव्यक्ती की, उत्पन्नाचे स्रोत?