in

समलिंगी विवाहावर कोर्टाचा युक्तिवाद; पाच हजार वर्षांत सनातन धर्मावर अशी वेळ आली नव्हती…

Share

दिल्ली उच्च न्यायालयात एका जोडप्याने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी, या मागणीसाठी याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान, सनातन धर्माच्या 5 हजार वर्षांत अशी वेळ कधीच आली नसल्याचा युक्तिवाद केला गेल्याचे समोर आले.

दिल्ली उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एका याचिकेत विशेष विवाह कायद्या (एसएमएस)नुसार विवाहाची परवानगी देण्याची व दुसऱ्या याचिकेत अमेरिकेत झालेल्या विवाहास परराष्ट्र विवाह कायदा (एफएमए) नुसार नोंदणी केली जाण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती आर एश एंडलॉ आणि न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या पीठाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस पाठवून विशेष विवाह कायद्यानुसार विवाहाची परवानगी मागणाऱ्या याचिकेबद्दल आपली भूमिका पुढील सुनावणीपर्यंत स्पष्ट करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२१ रोजी असणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

iPhone 12 झाला लॉन्च: इथे पहा नव्या किंमती

एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ?राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा