in

न्यायालयाने जामिन नाकारलेल्या कैद्याला दिले सोडून

गुन्हेगारी टोळीचे शहर बनत चाललेल्या पुण्यात न्यायालयाने जामिन नाकारलेल्या कैद्याला सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवाडा कारागृहातली ही घटना असून तेजस मोरे असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कारागृहाचे अपर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी दिले आहेत.

पुणे शहरासोबत अनेक बँकांना गंडा घालणाऱ्या आरोपी तेजस मोरेला पिंपरी पोलिसांनी शिताफीने अटक करत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. आरोपी तेजसने अनेकदा न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली मात्र ती नामंजुर झाली. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात वा़ढलेल्या तेजसने आपल्या ताकदीचा वापर करत जामिन न देताच कारागृहाच्या बाहेर पडला आहे. यामध्ये कारागृह प्रशासनाचा हात आहे की ? पुण्यात गुन्हेगारी इतकी वाढली आहे की आता कैदी कारागृह प्रशासनाच्याही नियंत्रणात राहत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कारागृहाचे अपर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत पीक विम्यात फसवणूक केल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

३० वर्षे पोलिसात काम करून तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले