in

Coronavirus Update | मुंबईतले चार वॉर्ड पुन्हा एकदा हॉटस्पॉट!

लॉकडाऊन निर्बंध शिथिल आणि सर्वसामन्यांना लोकल सेवा सुरू झाल्यापासून मुंबईतील काही भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर हे भाग पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहेत. बाधित रुग्ण आढळून आलेल्या ८५ चाळी-झोपडपट्टी आणि ९९२ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत

मुंबईतील लॉकडाऊन निर्बंध शिथिल आणि सर्वसामन्यांना लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड(मुलुंड), आर सेंट्रल(बोरिवली), एम वेस्ट(चेंबुर, टिळक नगर) या चार वॉर्ड मध्ये रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. या वॉर्डमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येत 10 ते 15% वाढ होतांना दिसतेय. चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्ण संख्यावाढीचा दर सर्वाधिक 0.26% इतका आहे.

98% रुग्णसंख्या वाढीच्या केस इमारतींच्या भागातून येत आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रहिवासी इमारतींना नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील विविध भागात कोरोना नियमांची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाण, विवाह कार्यालये, बाजार, गर्दीची ठिकाणी आदी ठिकाणी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच इमारतीत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्याच्या आणि कमीत कमी लोकांना इमारतीत प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणे ,विवाह कार्यालये, बाजार जागा याठिकाणीही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. इमारतींमध्ये बाहेरुन येणा-या व्यक्तींचे स्क्रीनींग करण्याबाबत तसेच कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एम वेस्ट वॉर्ड मध्ये एकूण 550 इमारतींना नोटीसा देण्यात आल्या.

मुंबईत सध्या एकूण 810 इमारती सील आहेत. यांपैकी टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये सर्वाधिक 170 इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या सक्रीय कंटेंटमेंट झोनची संख्या 76 आहे.

घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील १६२ इमारती सील करण्यात आल्या. १४ झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. येथे २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील १० झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित आहेत. माहीममध्ये बुधवारी १७ बाधित रुग्ण सापडले.

चेंबूरमधील ५५० इमारतींना नोटीस

  • चेंबूरमध्ये रुग्णवाढ सर्वाधिक असल्याने पालिकेने येथील तब्बल ५५० गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीस बजावली.
  • मुंबईत सध्या रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१६ टक्का इतका असताना चेंबूरमध्ये ताे ०.२६ टक्का आहे.
  • चेेंबूरमध्ये बाहेरील व्यक्तींना सोसायटीत मर्यादित प्रवेश द्यावा. सोसायटीत येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येक रहिवाशाची शारीरिक तापमान तपासणी करावी. इमारतीमधील रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्यास नियमानुसार १४ दिवस विलगीकरण करावे. बाधिताच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी, असे नाेटिसीत नमूद करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एकनाथ खडसेंना 24 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

Unnao Gilrs Death | शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळल्या दलित मुली; दोघींचा मृत्यू