in

Coronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू

Share

नागपुरात कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी स्थिती नियंत्रणात आली नसल्याने जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. महापौर संदीप जोशी तसंच आमदारांची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासोबत आज महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत शनिवार आणि रविवार असे दोन जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली.

दोन आठवड्यांसाठी हा कर्फ्यू लागू असणार आहे. महिनाअखेरीस बैठकीदरम्यान कालावधी वाढवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. संदीप जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील पदाधिकारी, विरोक्षी पक्षनेते यांची आयुक्तांसोबतबैठक पार पडली. बैठकीत लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाली. लोकप्रतिनिधींची लॉकडाउन संदर्भात मागणी होती. आयुक्तांचं मात्र मत वेगळं असून लॉकडाउन लावणं हिताचं नाही असं त्यांनी सांगितलं, लॉकडाउन लावल्यास अडचणी वाढतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंही लॉकडाउन लावण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे”.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आमदार निवासावर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना झाला कोरोना