in

Covid-19 : मुंबई, ठाण्यात रुग्णवाढ

राज्यात उपचाराधीन कोरोना रुग्णांपैकी ७२ टक्के बाधित मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, नगर या पाच जिल्ह्यंत आहेत. मुंबईत रविवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीने दोन महिन्यांतील उच्चांक नोंदवला, तर ठाणे जिल्ह्यतही काही दिवसांपासून रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डॉक्टर’ परिषदेत केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन परिषदेला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोरोना कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, बालकांच्या कृतिदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांच्यासह अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत असणारे आणि नायर रुग्णालयाचे स्नातक डॉ. मेहुल मेहता यांनी मार्गदर्शन केले.

राज्यातील करोनाची सद्य:स्थिती, दैनंदिन रुग्णसंख्या, चाचण्या यांचा आढावा आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या परिषदेत मांडला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात कमी होऊन सुमारे ५० हजारांपर्यंत होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात पुन्हा किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात ५० हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक १५ हजार ४६९ (२९.७३ टक्के) रुग्ण पुण्यात आहेत, तर त्या खालोखाल ठाण्यामध्ये ७,१७१(१३ टक्के), साताऱ्यामध्ये ६१७५(११.८७ टक्के), अहमदनगरमध्ये ५०५१ (९.७१ टक्के) तर मुंबईत ४०३१(७.७५ टक्के) रुग्ण आहेत. यापाठोपाठ सांगली (६.८० टक्के), सोलापूर (५.१७ टक्के), रत्नागिरी (२.१० टक्के), कोल्हापूर (१.९६ टक्के) आणि सिंधुदुर्ग (१.७४ टक्के) रुग्ण आहेत. असे १० जिल्ह्यांमध्येच ९० टक्के रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोठी बातमी : अनिल देशमुखांविरोधात लुकआउट नोटीस जारी

ड्रोन्समधून पंजशीरवर बॉम्बहल्ला; पाकिस्तानकडून स्मार्ट बॉम्बचा वापर