in

Coronavirus | सावधान! मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू

Share

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. आजमध्य रात्रीपासूनच मुंबईत हे कलम लागू करण्यात येणार असून, परिणामी शहरामध्ये पुन्हा एकदा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यत ही जमावबंदी राहणार आहे.

याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. परिपत्रकात असंही नमूद करण्यात आलं आहे की, ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही.  ही एक रुटीन ऑर्डर आहे. त्यामुळे अनलॉक मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. हे एक रुटीन पत्रक आहे. जे पोलिसांकडून दर १५ दिवसांनी जारी केलं जातं. 

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

इंदूमिलमध्ये आंबेडकर स्मारकाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

गृहमंत्री अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज