in

कोरोनाचा कहरच; ओलांडला 47 लाखांचा टप्पा

Share

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 47 लाखांच्या पल्ल्याआड पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे.
गेल्या 24 तासांत देशात 94 हजार 372 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार 114 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 लाख 54 हजार 357 झाली आहे. 9 लाख 73, 175 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे मागील तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झालीय. गेल्या तीन दिवसांत देशात 96 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले होते. तसेच कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं देशातील प्रमाण (रिकव्हरी रेट) 77.77 टक्क्यांवर पोहचला आहे. देशात आतापर्यंत 37 लाख दोन हजार 596 जणांनी करोनावर मात केली आहे.

राज्याची आकडेवारी

महाराष्ट्राने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं दहा लाखांचा टप्पा पार केला आहे. शनिवारी दिवसभरात 22,084 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 10,37,765 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली आहे.राज्यातील रुग्ण वाढीच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे आजचे प्रमाण हे 70.02 एवढे झाले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Western Railway मध्ये भरती

आता ‘या’ अभिनेत्रीला झाला कोरोना