in ,

मिरा भाईंदरातमध्ये कोरोनाचा कहर! २४ तासात नवे २१ रुग्ण; एक मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ३५१ वर

Share

मिरा भाईंदर: शहरात मध्ये मागील २४ तासात पुन्हा नवीन २१ रुग्ण आढळले; तर शहरातील रुग्णांची संख्या ही तीन शतक पार होऊन आता ३५१ वर गेली आहे. शहरात ११२ कार्यरत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आहेत, तर आतपर्यंत ११ कोरोना बाधितांचा मृत्य झाला आहे त्यात काल एकाचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णामध्ये १२ पुरुष तर ५ महिला आहेत तर २, ४ व १३ वर्षाच्या लहान मुलांना व ८ वर्षाच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव हा मीरा भाईंदर मधील गणेश देवल नगर, पेनकरपाडा व राई-शिवनेरी झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने गणेश देवल नगर भागातील ४६० जणांना अलगिकरण कक्षात नेऊन ठेवले आहे. मिरा भाईंदरच्या नवीन रुग्णांमध्ये ३ वर्षाचा मिरारोड येथील शांतीपार्क भागातील १ मुलगा आहे, तर ४ वर्षाचा मुलगा बेव्हरली पार्क भागातील आहे, नयानगर भागातील ८ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे दरम्यान त्याच ठिकाणच्या १३ वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, यात ९ रुग्ण नव्याने शहरात आढळून आलेले आहेत तर १२ रुग्ण हे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिकेने कोरोनाची आकडेवारी देताना शहरात आतापर्यंत २२८ कोरोनाबधित रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत ११ जनांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच ११२ रुग्ण कार्यरत असुन काल ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे असे सांगीतले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नागपूरचं कॉटन मार्केट अटी आणि शर्थींवर आजपासून सुरु

यवतमाळच्या आर्णी जवळ भीषण अपघात; ३ प्रवासी जागीच ठार, २२ जखमी