in , , ,

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत काही दिवसांपासून उतार पाहायला मिळत आहे, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. सलग दोन दिवस 20 हजारांच्या आत आलेली रुग्णसंख्या काल दिवसभरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात भारतात 23 हजार 529 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 311 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 28 हजार 718 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

देशात काल दिवसभरात 23 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 311 जणांना आपला जीव गमवावा लागलला आहे. तर काल दिवसभरात 24 तासात एकूण 28 हजार 718 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर राज्यात बुधवारी 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 49 जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.

तसेच महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.26 टक्के आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना च्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बुधवारी 12 हजार 161 रुग्णांची भर पडली तर 155 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल 17 हजार 862 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आनंदराव अडसूळ यांची न्यायालयात धाव

पोलिस मदत केंद्र कोठी अंतर्गत श्रमदानातून केली पुलाची दुरुस्ती