in

कोरोनाचा कहरचं; ओलांडला 56 लाखांचा टप्पा

Worrying! Today, there are 8,493 new patients in the state
Worrying! Today, there are 8,493 new patients in the state
Share

देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येण्याचे नावचं घेत नाही आहेत. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतचं चालला आहे. आज सकाळपर्यत कोरोना रुग्णांनी 56 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ही देशासाठी ही चिंतेची बाब आहे.

देशभरात मागील 24 तासांत देशात 83 हजार 347 नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, 1 हजार 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 56 लाख 46 हजार 11 वर पोहचली आहे. यामध्ये कोरोनाबाधित 9 लाख 68 हजार 377 अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले 45 लाख 87 हजार 614 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 90 हजार 20 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका

कोरोना लसीसंदर्भात मोठी बातमी…